Posts

Ashwini Ye Na / अश्विनी ये ना, ये ना

अश्विनी ये ना ये ना  प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं कशी ही ज़िन्दगीत आणीबाणी गं ये ना प्रिये, तू ये ना प्रिये मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरासा नशिला प्रिया उगाच संशयात मी बुडाले रे तुला छळून मी जळून गेले रे ये साजणा तू ये साजणा विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे मंद धुंद ही गुलाबी हवा प्रीत गंध हा शराबी नवा हात हा तुझाच हाती हवा झोंबतो तनूस हा गारवा तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी फुलांतुनी उमलती कशी गोड गाणी तू ये ना तू ये ना ना ना ना ये अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतीच्या न्हाऊनी स्वप्न आज जागले लोचनी अंग अंग मोहरे लाजुनी जाऊ नको दूर आता मन फ़ुलवूनी तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी तू ये ना तू ये ना

Dadla Nako Ga Bai (Bharud) / दादला नको गं बाई

बया बया बया काय झालं बया  बया बया बया काय की गं बया दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई अगं पण असं का? मोडकंच घर, तुटकंच छप्पर (मग असं ना) अवं मोडकंच घर अन् तुटकंच छप्पर (मग ऱ्हा कि त्यात) अवं पन ऱ्हायला जागा नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी (अगं ती तरी कुठं मिळती) अवं फाटकंच लुगडं नि तुटकीच चोळी (मग शिवून घे की) पन शिवायला दोरा नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई कळण्याची भाकर अंबाड्याची भाजी (अगं ती तर लई गॉड वाटती ) कळण्याची भाकर नि निस्तीच अंबाड्याची भाजी (मग काय झालं त्यात ) वर तेलाची धारच नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई एकजनार्दनी समरस झाले (अगं झालीस ना समरस) पण तो रस येथे नाही (कुठला ?) तो रस येथे नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई

Ashtavinayaka Tujha Mahima Kasa / अष्टविनायका तुझा महिमा कसा

अष्टविनायका तुझा महिमा कसा   दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा गणपती पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू आता काय सांगू डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं वृंदावनी जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर मंडपात आरतीला खुशाल बसा गणपती गणपती गं चौथा गणपती बाई रांजणगावचा देव महागणपती दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण किती गुणगान गावं किती क

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

ऐलमा पैलमा गणेश देवा  माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा मांडला ग मांडला वेशीच्या दारी पारवळ घुमतं बुरजावरी गुंजावनी डोळ्याच्या सारवीन टिक्का आमच्या गावच्या भुलोजी नायका एवीनी गाव तेवीनी गाव कांडा तिळुबाई तांदूळ घ्या आमुच्या आया तुमच्या आया खातील काय दूध उंडे उंड्याशी लागली टाळी आयुष्य दे रे ब्रम्हाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पड पड पावसा थेंबा थेंबी थेंबा थेंबी आळ्या लोंबी आळ्या या लोंबती अंखणा अंखणा तुझी सात कणसं हदग्या तुझी सोळा वर्षं

Akkan Mati Chikkan Mati / अक्कण माती चिक्कण माती

  अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा  अस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सा जातं सुरेख बाई रवा पिठी काढावी अश्शी रवा पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावे अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरा धाडावी अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं अस्सं आजोळ गोड बाई खेळायला मिळतं 

Aaj Konvar Bai Aaj Konvar / आज कोण वार बाई आज कोण वार

  आज कोण वार बाई आज कोण वार आज वार सोमवार, महादेवाला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार मंगळवार, मंगळागौरीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार बुधवार, बुधबृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार गुरुवार, दत्ताला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार शुक्रवार, महालक्ष्मीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार शनिवार, मारुतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार रविवार, सूर्यदेवाला नमस्कार

Aad Bai Aadoni / आड बाई आडोणी

आड बाई आडोणी  आडाचं पाणी काढोनी आडात पडली मासोळी आमचा भोंडला सकाळी आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात होती सुपारी आमचा भोंडला दुपारी आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला