Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा



ऐलमा पैलमा गणेश देवा 
माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
मांडला ग मांडला वेशीच्या दारी
पारवळ घुमतं बुरजावरी
गुंजावनी डोळ्याच्या सारवीन टिक्का
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवीनी गाव तेवीनी गाव
कांडा तिळुबाई तांदूळ घ्या
आमुच्या आया तुमच्या आया
खातील काय दूध उंडे
उंड्याशी लागली टाळी
आयुष्य दे रे ब्रम्हाळी
माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबा थेंबी
थेंबा थेंबी आळ्या लोंबी
आळ्या या लोंबती अंखणा
अंखणा तुझी सात कणसं
हदग्या तुझी सोळा वर्षं

Comments