Posts

Showing posts from July, 2020

Ashwini Ye Na / अश्विनी ये ना, ये ना

अश्विनी ये ना ये ना  प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं कशी ही ज़िन्दगीत आणीबाणी गं ये ना प्रिये, तू ये ना प्रिये मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरासा नशिला प्रिया उगाच संशयात मी बुडाले रे तुला छळून मी जळून गेले रे ये साजणा तू ये साजणा विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे मंद धुंद ही गुलाबी हवा प्रीत गंध हा शराबी नवा हात हा तुझाच हाती हवा झोंबतो तनूस हा गारवा तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी फुलांतुनी उमलती कशी गोड गाणी तू ये ना तू ये ना ना ना ना ये अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतीच्या न्हाऊनी स्वप्न आज जागले लोचनी अंग अंग मोहरे लाजुनी जाऊ नको दूर आता मन फ़ुलवूनी तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी तू ये ना तू ये ना

Dadla Nako Ga Bai (Bharud) / दादला नको गं बाई

बया बया बया काय झालं बया  बया बया बया काय की गं बया दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई अगं पण असं का? मोडकंच घर, तुटकंच छप्पर (मग असं ना) अवं मोडकंच घर अन् तुटकंच छप्पर (मग ऱ्हा कि त्यात) अवं पन ऱ्हायला जागा नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी (अगं ती तरी कुठं मिळती) अवं फाटकंच लुगडं नि तुटकीच चोळी (मग शिवून घे की) पन शिवायला दोरा नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई कळण्याची भाकर अंबाड्याची भाजी (अगं ती तर लई गॉड वाटती ) कळण्याची भाकर नि निस्तीच अंबाड्याची भाजी (मग काय झालं त्यात ) वर तेलाची धारच नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई एकजनार्दनी समरस झाले (अगं झालीस ना समरस) पण तो रस येथे नाही (कुठला ?) तो रस येथे नाही मला दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई

Ashtavinayaka Tujha Mahima Kasa / अष्टविनायका तुझा महिमा कसा

अष्टविनायका तुझा महिमा कसा   दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा गणपती पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू आता काय सांगू डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं वृंदावनी जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर मंडपात आरतीला खुशाल बसा गणपती गणपती गं चौथा गणपती बाई रांजणगावचा देव महागणपती दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण किती गुणगान गा...

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

ऐलमा पैलमा गणेश देवा  माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा मांडला ग मांडला वेशीच्या दारी पारवळ घुमतं बुरजावरी गुंजावनी डोळ्याच्या सारवीन टिक्का आमच्या गावच्या भुलोजी नायका एवीनी गाव तेवीनी गाव कांडा तिळुबाई तांदूळ घ्या आमुच्या आया तुमच्या आया खातील काय दूध उंडे उंड्याशी लागली टाळी आयुष्य दे रे ब्रम्हाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पड पड पावसा थेंबा थेंबी थेंबा थेंबी आळ्या लोंबी आळ्या या लोंबती अंखणा अंखणा तुझी सात कणसं हदग्या तुझी सोळा वर्षं

Akkan Mati Chikkan Mati / अक्कण माती चिक्कण माती

  अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा  अस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सा जातं सुरेख बाई रवा पिठी काढावी अश्शी रवा पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावे अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरा धाडावी अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं अस्सं आजोळ गोड बाई खेळायला मिळतं 

Aaj Konvar Bai Aaj Konvar / आज कोण वार बाई आज कोण वार

  आज कोण वार बाई आज कोण वार आज वार सोमवार, महादेवाला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार मंगळवार, मंगळागौरीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार बुधवार, बुधबृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार गुरुवार, दत्ताला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार शुक्रवार, महालक्ष्मीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार शनिवार, मारुतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार रविवार, सूर्यदेवाला नमस्कार

Aad Bai Aadoni / आड बाई आडोणी

आड बाई आडोणी  आडाचं पाणी काढोनी आडात पडली मासोळी आमचा भोंडला सकाळी आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात होती सुपारी आमचा भोंडला दुपारी आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला

Jau Ne Na Va / आई मला खेळायला जायचंय .. जाऊ दे न वं

  भूर भूर भूर भूर भूर भूर मध किती गोड गोड गोड झाडावर जू जू झूल काडीवर मुंगळ्याची सर्कस गोल गोल गोल तोल जाऊन चाक होई गोल गोल गोल गोल गोल गोल गोल ट्रॅक्टर वर चक्कर मारायची दूर दूर दूर कागदाचं विमान उडतंय भूर भूर भूर आई मला खेळायला जायचंय .. जाऊ दे न वं नदीमध्ये पवायला जायचंय .. जाऊ दे न वं माझा सगळा अभ्यास झालाय... जाऊ दे न वं मी तुझं सगळं काम ऐकतो... जाऊ दे न वं भूर भूर भूर भूर भूर भूर रोज सकाळी उठायचं कोंबडीचं घर उघडायचं पिल्लूच्या मागे नाचायचं थुई थुई थुई थुई थुई रेडकूचं लोब करायचं चकाचक आंघोळ करायची पटापट शाळेला जायचं टमटम मध्ये बुई वर्गात कॉमिक्स ची मज्जाच लई लई लई कच्चा जांबा बोरांची गोडीच लई लई लई साबणाचे रंगीत रंगीत फुग्गे उडवू लई लई लई दगड की माती खेळायला पोट्टे जमवू लई लई लई सगळ्यात जास्त लाड माझी आज्जी करते अंगणात गोष्ट ऐकवत ऐकवत झोपवते पण रात्री थंडीत झोप मोडते न वं आई मला तुझ्या कुशीतच आवडते .. जवळ ये न वं आई तुझा हात झोपताना असाच .. राहू दे न वं आजवानी उद्या बी खेळायला ... जाऊ दे न वं 

Vaat Pahuni Jeev Shinala / वाट पाहुनी जीव शिनला

वाट पाहुनी जीव शिनला   दिसा मागुनी दिस टळला सुर्व्या आला तळपून गेला मावळतीच्या खळी गालाला गडनी सखे गडनी कुटं गुंतला सब्द इसरला देऊन अपुल्या सजनीला डोंगर वलंडून चांद चालला चांदनं चारून धरतीला मासं जोडी-जोडीनं पवती पाखरं संगती संगतीनं फिरती एक डहाळीवर बिलगुन फुलती फुलं कळ्या त्या येलाला

Khel Kunala Daivacha Kalala / खेळ कुणाला दैवाचा कळला

                     खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो, तू असो, हा असो, कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला जवळ असुनही कसा दुरावा भाव मनीचा कुणा कळावा हार कुणाची जीत कुणाची झुंज चालली दोन मनांची सौभाग्याला मिळे सहारा मला ना माहीत कुठे किनारा

Jhalya Tinhi Sanja / झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा

                      झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा  वाट पहाते मी गं येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा भेटीत रायाच्या सांगेन मी सारं सोसवेना बाई मला यौवनाचा भार तान्हेला हरणीला हळुच पाणी पाजा त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा वाटतं सख्याचं वाजलं पाऊल खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल घालू कशी मी साद होईल गाजावाजा इचारच पडला बिचाऱ्या मनाला वेळ का गं व्हावा बाई सख्या साजनाला बिलगून बसावी शंभूला सारजा

Nighalo Gheun Dattachi Palakhi / निघालो घेऊन दत्ताची पालखी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळूक कोवळी चंदनासारखी सातजन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मूर्ती पहाटेसारखी वाट वळणाची जिवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळियांत गंगा जाहली बोलकी

जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा

जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा  तुला घालिते चारा, तुला घालिते चारा द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा दूर डोंगरापल्याड नदीकाठी माजा गाव तिथं नांदतोया देव नरसूबाराव ल्हान थोरासी मायेचा त्योच आसरा बाई म्हायेराचं थोरपण वानु कसं पुण्यवंत माज मायबाप देव जसं गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा माज्या खुशालीचा सांगावा दे माऊलीला पड पाया तिच्या सांग येती याद मला तुला भेटाया होतो माझा जीव घाबरा

Aga Hema Mazya Prema / अगं हेमा माझ्या प्रेमा

  अगं हेमा माझ्या प्रेमा  तुझी माझी जोडी जमली गं अशी झक्कास पोरगी पटली गोरी-गोरी कोरी-कोरी इष्काची नोट ही वटली लाडीगोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली निळ्या-निळ्या नभात या दोघांची प्रीती नटली थोडीसी मी लाजाळू ज्वानी कशी सांभाळू भीती तुला कसली गं मनात प्रीती वसली गं जाई जुई शेवंती तशीच मी रे लजवंती पाहुनी तुजला जीव हा फुलला गंधाने मन हे न्हाले माझी गं तू गुणवंती मिठीत ये ना फुलवंती ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले गुलाबाची लाली तुझ्या गालावरी कशी आली गं ओठांत लपली प्रीती ही अपुली लाजेनं बहरून आली गं प्रेमाच्या या खाणाखुणा मुक्याने घ्याव्या जाणून डोळ्यांत टिपलं मनात जपलं प्रीतीचं फुल मी गोडीनं

Sang Tu Majhach Na / सांग तू माझाच ना

                                                     सांग तू माझाच ना  राहू कशी तुझियाविना चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले भासते उतरून खाली स्वर्ग ये जणू पाहुणा भेट होता एक झाले मी नवी जग ही नवे वाटते आले जुळुनी जन्मजन्मीचे दुवे जीवना लाभे किनारा स्वप्न लाभे लोचना हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे दूर नाही जायचे स्वप्नात ही मनमोहना

Hasnar Kadhi Bolnar Kadhi / हसणार कधी? बोलणार कधी?

                                                  हसणार कधी? बोलणार कधी? नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी? हसणार नाही बोलणार नाही माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही मोठ्या-मोठ्या बाता, बढाया, मारल्या कोणी? बघू या ग, करू या की, नाही म्हटलंय कोणी? बोलाचाच भात नि बोलाचीच कढी ज्या त्या गोष्टीत पाहू या करू या करू या पाहू या गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण? जाणुन बुजूण भोंदू बगळा बनलंय कोण? लग्नाची घाई मला बुवा नाही होईल तेव्हा होऊं द्या केव्हाही कधीही केव्हाही कधीही

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?

                                             नाच ग घुमा  कशी मी नाचू ? ह्या गावचा, त्या गावाचा सोनार न्हाई आला जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ? नाच ग घुमा ह्या गावचा, त्या गावाचा शिंपी न्हाई आला चोळी न्हाई मला कशी मी नाचू ? नाच ग घुमा ह्या गावचा, त्या गावाचा कासार न्हाई आला बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ? नाच ग घुमा फू बाई फू फुगडी चमचम करतीया बुगडी पाट बाई पाट चंदनाचा पाट पतीदेव बघतात माडीवर वाट बारा घरच्या बायका एक जागी मिळू या चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या लेक बोलते लाडकी घरी गोकुळ साजणी वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव ह्यो रमू दे गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव ह्यो रमू दे पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी ...

Mangla Ga Mangla / मंगला ग मंगला

                                                   मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला  तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला लग्नाआधी सावळा गोंधळ नाही हो चांगला लग्नात वाजवूया अग बेंडबाजा वरातीच्या घोड्यावरती रानीसंग राजा हनीमून करायला जीव माझा रंगला ग रंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला दोघं दोघं मिळुनी उडवू धमाल घंटा संसारी सुखाची होईल कमाल पॊटामधी तालावर अंकुर दंगला हो दंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला घरामधी दोघंजन गोकुळ फुलवू या दोघांच्या घरान्याचा झोपाळा झूलवू या रानीला पेंग आली राजा बी झिंगला ग झिंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला पोरांना पोरं होता पडशील फशी म्हाताऱ्याला म्हातारी भेटल कशी हाय राम स्वप्नाचा मनोरा भंगला की भंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला...

Ye Jivlaga Ye (Ekapeksha Ek) / ये जिवलगा ये

                                              ये जिवलगा ये भिजून जाऊ असे प्रणयातच विसरू जगा हाय हाय हाय हाय हाय हाय ये जिवलगा ये काय असा प्रणय जुळतो तम इथला कधी न ढळतो बघ तुझे हे यौवन जाईल सुकूनी उगा हाय हाय हाय हाय हाय हाय मनातली ही प्रीती जन्मोजन्मीची या प्रीतीची बोली चार नयनांची उमले कलिका झुळुक लहरता वाऱ्याची ती भाषा असते रे स्पर्शाची प्रीत खुळ्या तू उमल फुला मदन मिळो ग सजण तुला तुजविना मनमीत नको मज कुणीही दुजा हाय हाय हाय हाय हाय हाय या चांदवेड्या रातीला मी कवळिले सख्या झाले तुझी चांदणी या ढगावर राया अशी पहुडले पुरी बेभान मी होऊनी तुझ्या संगतीनं दिसे मज दुनिया आकाशाच्या तारांगणी मदनाच्या पाऱ्याची नवखी किमया झाली सखे साजणी दोन्ही दिवाणे मने धुंद झाली प्रीती अशी ही अमर अपुली बहर आज नवा प्रेमाचा ऋतू सजला हाय हाय हाय हाय हाय हाय ये दिलरुबा ये जवळ ये सखी आज दिले मी हृदय तुला हाय हाय हाय हाय हाय हाय

Priyatamaa Priyatamaa / प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा

                                                   प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा  प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा चार दिसाची ज्वानी .. (ज्वानी तोंड बघा) चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा (ए म्हातारड्या हो बाजूला) जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी शृंगाराची डर्बी जिंकीन होशिल तू ग राजी प्रियतम्मा प्रियतम्मा नाही मी निकम्मा प्रेम दिवाणा नंदी मी ग तू तर माझी हम्मा ये मिठीत ये ना जाणून घे ना माझे अस्सल रूप मला बिलगता कळेल सारे तुजला आपोआप प्रियतम्मा प्रियतम्मा ये माझ्या प्रेमा श्रीदेवी तू जयाप्रदा तू तूच माझी हेमा

Gulabachi Kali / गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली

                                                  गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली नटुन थटुन लाजते जनू चांदनी कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो कोण हलकेच तार काळजाची छेडतो कधी कधी कधी कधी कधी कधी देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देहभान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्या जिवाला लावते मन विसरून वाट सैरभैर धावते डोलते बोलते सनई तालासंगे सूर हळवे असेच जन्म सात राहू दे उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

Disla Ga Bai Disla / दिसला गं बाई दिसला

                                                      ज्वानीच्या आगीची मशाल हाती  आले मी अवसंच्या भयाण राती काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरात गाती दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला ग बाई बाई कुठं दिसंना मला कुठं दिसंना, इथं दिसंना इथं दिसंना, तिथं दिसंना शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं दिसला गं बाई दिसला मला बघून गालात हसला गं बाई हसला गडी अंगानं उभा नि आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामधी ठसला ग बाई बाई काळजामधी ठसला काळजामधी, काळजामधी, काळजामधी माझ्या राजाचा न्यारा डौल डाव्या डोळ्याचा देतोय कौल लहरी पटका मानेला झटका, भाला उरी घुसला ग बाई बाई भाला उरी घुसला भाला उरी, भाला उरी, भाला उरी अंगा अंगाची करते अदा आग आगीवर झाले फिदा उडंल भडका चढलं धुंदी जीव जीवा फसला ग बाई बाई जीव जीवा फसला जीव जीवा, जीव जीवा, जीव जीवा

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

                                                    जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती ! स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती ! स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती ! स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे हे अधम-रक्तरंजिते । सुजन-पूजिते । श्री स्वतंत्रते । श्री स्वतंत्रते । श्री ...

Sajni Ga Bhulalo Mee / सजणी गं भुललो मी

                                                       सजणी गं भुललो मी, काय जादू झाली  बगुन तुला जीव माझा होई वर खाली सजणा रं काय सांगू, कुणी जादू केली लाज मला आली बाई लाज मला आली काल मला ह्याची बाई जाण नव्हती आज कशी मोहरून आली नवती अंग चोरतीया कशी लाजाळूची येली अल्लड चाळ्याची खोडी कुठे गेली नको घेऊ विळख्यात सजना असा बघत्यात झाडं येली भर दिवसा डोंगरची मैना कशी एकांताला भ्याली कळी ही गुलाबी सुगंधात न्हाली लपंना ही हुरहूर आज पदरी शालू चोळी नेसून मी झाले नवरी काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली

हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा

                                                    जगी सर्व सुखी असा कोण आहे  विचारी मना तूच शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा अळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे जमिनीवरती उगा शोधिसी आकाशातील तारे हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग, मनुजा जाग फसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग, मनुजा जाग किती आले, किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळुन सारे गेले बीज होऊनी मातीमधुनी अंकुर बनुनी यावे जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मळ व्हावे थोडे द्यावे थोडे घ्यावे एकमेकां प्रेम द्यावे जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे चाकावाचून गाडी नाही ताकावाचून लोणी मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कुणी

हाऊस ऑफ बॅम्बू

नंबर ५४ (Number 54) द हाऊस विथ द बॅम्बू डोअर (The House with the Bamboo Door) ओ.. बांबूचे घर, बांबूचे दार बांबूची जमीन पिवळीशार बांबूच्या वनात वाऱ्याचा सूर जिवाला नेतो भुलवुनी दूर हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo) बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणे माझ्याच पाठी बांबूच्या घरात स्वप्नाचा झुला झुलवीत राहील तुला नि मला हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo) बांबूचे घर पहायला हवे बांबूच्या घरात रहायला हवे रूपाचा उजेड डोळ्याचा दिवा बांबूच्या घरात तेवायला हवा हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo)

बनवाबनवी अशी हि बनवाबनवी

बनवाबनवी अशी हि बनवाबनवी साडी अशी नेसू नि गालांवरी हसू जगा जसे हवे या तसे तसे दिसू भीती वाटे मला कि कुठेतरी फसू जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी चंद्रमुखी दिसतेस अशी तुझी माझी हि जोडी गं किती किती छान छान ये सजणी जवळी सजुनी तू किती ग नाजूक गोरी गोरी गोरी पान मी तर रंभा-उर्वशी तू रे इस्पिक चा राजा ओ असल्या शृंगारानं तू आमचा वाजविला बाजा ह्याची टोपी त्याला नि त्याची टोपी ह्याला कळे ना हे ज्याला तो पुरता बुडाला लोकं भुलताती या वरल्या रंगाला जो खोटं करी खरं त्याला दुनिया सलाम करी बनवाबनवी अशी हि बनवाबनवी तू नवरी कशी गं जबरी, राजी-खुशीनं गोडीनं माझं सारं मान-मान मी नवरा दिसतो भवरा तुझ्या कुंकवाच ठेव बाई थोडं तरी भान-भान नको रे रागानं बोलू मनमोहना राधा प्रीतीची मी बावरी होय बावरी चल रे आनंदे संसार मांडूया नवरी लाडाची मी, नवरी लाडाची मी नवरी लाडाची मी लाजरी हाय लाजरी नाचू खेळू गाऊ नि मजेमध्ये राहू उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साहू जिथं जिथं जाऊ तिथं चलाखी हि दावू सुखासाठी जगामध्ये इथे तिथे चाले अशी बनवाबनवी अशी हि बनवाबनवी