Ashwini Ye Na / अश्विनी ये ना, ये ना


अश्विनी ये ना ये ना 
प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं
कशी ही ज़िन्दगीत आणीबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
प्रिया उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा तू ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
मंद धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनूस हा गारवा
तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलांतुनी उमलती कशी गोड गाणी
तू ये ना तू ये ना
ना ना ना
ये अशी मिठीत ये साजणी
पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग मोहरे लाजुनी
जाऊ नको दूर आता मन फ़ुलवूनी
तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी
तू ये ना तू ये ना

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?