बनवाबनवी अशी हि बनवाबनवी

बनवाबनवी अशी हि बनवाबनवी
साडी अशी नेसू नि गालांवरी हसू
जगा जसे हवे या तसे तसे दिसू
भीती वाटे मला कि कुठेतरी फसू
जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी
चंद्रमुखी दिसतेस अशी तुझी माझी हि जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी तू किती ग नाजूक गोरी गोरी गोरी पान
मी तर रंभा-उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
ओ असल्या शृंगारानं तू आमचा वाजविला बाजा
ह्याची टोपी त्याला नि त्याची टोपी ह्याला
कळे ना हे ज्याला तो पुरता बुडाला
लोकं भुलताती या वरल्या रंगाला
जो खोटं करी खरं त्याला दुनिया सलाम करी
बनवाबनवी अशी हि बनवाबनवी
तू नवरी कशी गं जबरी, राजी-खुशीनं गोडीनं माझं सारं मान-मान
मी नवरा दिसतो भवरा तुझ्या कुंकवाच ठेव बाई थोडं तरी भान-भान
नको रे रागानं बोलू मनमोहना
राधा प्रीतीची मी बावरी होय बावरी
चल रे आनंदे संसार मांडूया
नवरी लाडाची मी, नवरी लाडाची मी
नवरी लाडाची मी लाजरी हाय लाजरी
नाचू खेळू गाऊ नि मजेमध्ये राहू
उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साहू
जिथं जिथं जाऊ तिथं चलाखी हि दावू
सुखासाठी जगामध्ये इथे तिथे चाले अशी
बनवाबनवी अशी हि बनवाबनवी

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?