हाऊस ऑफ बॅम्बू

नंबर ५४ (Number 54)
द हाऊस विथ द बॅम्बू डोअर (The House with the Bamboo Door)
ओ.. बांबूचे घर, बांबूचे दार
बांबूची जमीन पिवळीशार
बांबूच्या वनात वाऱ्याचा सूर
जिवाला नेतो भुलवुनी दूर
हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo)
बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी
बांबूच्या घरात स्वप्नाचा झुला
झुलवीत राहील तुला नि मला
हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo)
बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात रहायला हवे
रूपाचा उजेड डोळ्याचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा
हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo)

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?