Dadla Nako Ga Bai (Bharud) / दादला नको गं बाई



बया बया बया काय झालं बया 
बया बया बया काय की गं बया
दादला नको गं बाई
मला नवरा नको गं बाई
अगं पण असं का?
मोडकंच घर, तुटकंच छप्पर
(मग असं ना)
अवं मोडकंच घर अन् तुटकंच छप्पर
(मग ऱ्हा कि त्यात)
अवं पन ऱ्हायला जागा नाही
मला दादला नको गं बाई
मला नवरा नको गं बाई
फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी
(अगं ती तरी कुठं मिळती)
अवं फाटकंच लुगडं नि तुटकीच चोळी
(मग शिवून घे की)
पन शिवायला दोरा नाही
मला दादला नको गं बाई
मला नवरा नको गं बाई
कळण्याची भाकर अंबाड्याची भाजी
(अगं ती तर लई गॉड वाटती )
कळण्याची भाकर नि निस्तीच अंबाड्याची भाजी
(मग काय झालं त्यात )
वर तेलाची धारच नाही
मला दादला नको गं बाई
मला नवरा नको गं बाई
एकजनार्दनी समरस झाले
(अगं झालीस ना समरस)
पण तो रस येथे नाही
(कुठला ?)
तो रस येथे नाही
मला दादला नको गं बाई
मला नवरा नको गं बाई

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?