Disla Ga Bai Disla / दिसला गं बाई दिसला

                                                     

ज्वानीच्या आगीची मशाल हाती 
आले मी अवसंच्या भयाण राती
काजवा उडं, किरकिर किडं,
रानात सुरात गाती
दिलाचा दिलवर
जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला
ग बाई बाई कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, इथं दिसंना
इथं दिसंना, तिथं दिसंना
शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
गडी अंगानं उभा नि आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामधी ठसला
ग बाई बाई काळजामधी ठसला
काळजामधी, काळजामधी, काळजामधी
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौल
लहरी पटका मानेला झटका, भाला उरी घुसला
ग बाई बाई भाला उरी घुसला
भाला उरी, भाला उरी, भाला उरी
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाले फिदा
उडंल भडका चढलं धुंदी
जीव जीवा फसला
ग बाई बाई जीव जीवा फसला
जीव जीवा, जीव जीवा, जीव जीवा

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?