Gulabachi Kali / गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली

                                                 

गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटुन थटुन लाजते जनू चांदनी
कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो
कधी कधी कधी कधी कधी कधी
देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जिवाला लावते
मन विसरून वाट सैरभैर धावते
डोलते बोलते सनई तालासंगे
सूर हळवे असेच जन्म सात राहू दे
उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?