Jhalya Tinhi Sanja / झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा

                     

झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा 
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
तान्हेला हरणीला हळुच पाणी पाजा
त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा
वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
घालू कशी मी साद होईल गाजावाजा
इचारच पडला बिचाऱ्या मनाला
वेळ का गं व्हावा बाई सख्या साजनाला
बिलगून बसावी शंभूला सारजा

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?