Mangla Ga Mangla / मंगला ग मंगला

                                                  
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला 
तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
लग्नाआधी सावळा गोंधळ नाही हो चांगला
लग्नात वाजवूया अग बेंडबाजा
वरातीच्या घोड्यावरती रानीसंग राजा
हनीमून करायला जीव माझा रंगला ग रंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
दोघं दोघं मिळुनी उडवू धमाल घंटा
संसारी सुखाची होईल कमाल
पॊटामधी तालावर अंकुर दंगला हो दंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
घरामधी दोघंजन गोकुळ फुलवू या
दोघांच्या घरान्याचा झोपाळा झूलवू या
रानीला पेंग आली राजा बी झिंगला ग झिंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
पोरांना पोरं होता पडशील फशी
म्हाताऱ्याला म्हातारी भेटल कशी
हाय राम स्वप्नाचा मनोरा भंगला की भंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?