Sajni Ga Bhulalo Mee / सजणी गं भुललो मी

                                                      
सजणी गं भुललो मी, काय जादू झाली 
बगुन तुला जीव माझा होई वर खाली
सजणा रं काय सांगू, कुणी जादू केली
लाज मला आली बाई लाज मला आली
काल मला ह्याची बाई जाण नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
अंग चोरतीया कशी लाजाळूची येली
अल्लड चाळ्याची खोडी कुठे गेली
नको घेऊ विळख्यात सजना असा
बघत्यात झाडं येली भर दिवसा
डोंगरची मैना कशी एकांताला भ्याली
कळी ही गुलाबी सुगंधात न्हाली
लपंना ही हुरहूर आज पदरी
शालू चोळी नेसून मी झाले नवरी
काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?