Sang Tu Majhach Na / सांग तू माझाच ना

                                                    

सांग तू माझाच ना 
राहू कशी तुझियाविना
चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले
भासते उतरून खाली स्वर्ग ये जणू पाहुणा
भेट होता एक झाले मी नवी जग ही नवे
वाटते आले जुळुनी जन्मजन्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा स्वप्न लाभे लोचना
हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वप्नात ही मनमोहना

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?