Ye Jivlaga Ye (Ekapeksha Ek) / ये जिवलगा ये

                                             
ये जिवलगा ये
भिजून जाऊ असे प्रणयातच विसरू जगा
हाय हाय हाय हाय हाय हाय
ये जिवलगा ये
काय असा प्रणय जुळतो
तम इथला कधी न ढळतो
बघ तुझे हे यौवन जाईल सुकूनी उगा
हाय हाय हाय हाय हाय हाय
मनातली ही प्रीती जन्मोजन्मीची
या प्रीतीची बोली चार नयनांची
उमले कलिका झुळुक लहरता वाऱ्याची
ती भाषा असते रे स्पर्शाची
प्रीत खुळ्या तू उमल फुला
मदन मिळो ग सजण तुला
तुजविना मनमीत नको मज कुणीही दुजा
हाय हाय हाय हाय हाय हाय
या चांदवेड्या रातीला मी कवळिले
सख्या झाले तुझी चांदणी
या ढगावर राया अशी पहुडले
पुरी बेभान मी होऊनी
तुझ्या संगतीनं दिसे मज दुनिया
आकाशाच्या तारांगणी
मदनाच्या पाऱ्याची नवखी किमया
झाली सखे साजणी
दोन्ही दिवाणे मने धुंद झाली
प्रीती अशी ही अमर अपुली
बहर आज नवा प्रेमाचा ऋतू सजला
हाय हाय हाय हाय हाय हाय
ये दिलरुबा ये
जवळ ये सखी आज दिले मी हृदय तुला
हाय हाय हाय हाय हाय हाय

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?